पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

FIFA U 17 : महिला विश्वचषक स्पर्धेचा मुहूर्त ठरला!

भारतात रंगणार अंडर 17 फिफा वर्ल्ड कप

१७ वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २ ते २१ नोव्हेंबर २०२० दरम्यान भारतामध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा देशातील चार प्रमुख शहरात खेळवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच फिफाकडून भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमला स्थायी स्वरुपात परवानगी मिळाली होती. अद्याप यासंदर्भातील अंतिम निर्णय बाकी आहे. कोलकाता, नवी मुंबई, गोवा आणि अहमदाबाद ही शहरे देखील यजमान पदाच्या शर्यतीत आहेत. 

भुवनेश्वरमध्ये रंगणार १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा

भारताने यजमान पदासाठी पात्रता सिद्ध केली आहे. यापार्श्वभूमीवर १५ ते २८ सप्टेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या एएफसी अंडर-१६  महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने आपला संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  फिफाने दिलेल्या माहितीनुसार, २ ते २१ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येईल. योग्य वेळी यजमानपदाबाबतच्या शहरांची घोषणा करण्यात येणार आहे.

PKL : पुण्याच्या मैदानात विक्रमी धमाका!

स्पर्धेच्या संचालिका रोमा खन्ना म्हणाल्या की, कोलकाता, भुवनेश्वर, अहमदाबाद, गोवा आणि नवी मुंबई या पाच शहरांचे फिफाकडून निरीक्षण करण्यात आले आहे. काही अन्य शहरे देखील यजमानपदासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खन्ना पुढे म्हणाल्या की, वर्षाअखेरीस मुल्यांकनाचे दुसरी फेरी सुरु होईल. फिफा अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो यांनी मार्चमध्येच भारत या स्पर्धेचे यजमानपद करणार असल्याची घोषणा केली होती.