पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : भारतात होणारी अंडर १७ महिला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित

पहिल्यांदाच भारताला यजमानपद मिळालेली फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये पहिल्यांदाच होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघाने (फिफा) शनिवारी या वृत्ताल दुजोरा दिला असून स्पर्धेच्या तारखांची लवकर घोषीत करण्याचा प्रयत्न करु, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला: राज ठाकरे

२ ते २१ नोव्हेंबरच्या दरम्यान कोलकाता, गुवाहटी, भुवनेश्वर अहमदाबाद आणि नवी मुंबईच्या मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक स्पर्धा यापूर्वीही रद्द करण्यात आल्या आहेत. युरोपातील लोकप्रिय फुटबॉल स्पर्धेसह ऑलिम्पिक आणि विम्बल्डन स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरात ५९ हजारपेक्षा अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने १० लाख ९८ हजार लोकांना प्रभावित केले आहे. भारतात दोन हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून साठहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावलाय.  

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार

१७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत जगरातील १६ संघ सहभागी होणार होते. यजमानपद मिळवण्यात यश मिळाल्याने पात्रता सामना न खेळताही भारतीय महिला संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबईत रंगणार होता.  याशिवाय २० वर्षांखालील पनामा/कोस्टारिका येथे ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान रंगणारी महिला  विश्वचषक फुटबॉल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे.