पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडील गेल्याचे समजल्यावर 'ती' रडली नाही तर देशासाठी लढली!

भारताची हॉकीपटू लालरेम्सिआमी

क्रिकेटच्या मैदानात वडिलांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कपचं मैदान गाजवलं होतं. वडिलांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर भारताचा वर्तमान कर्णधार विराट कोहलीनंही रणजी सामन्यात लक्षवेधी खेळी केली होती. अगदी अशाच प्रकारे नुकत्याच जपानमध्ये पार पडलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताची स्टार हॉकीपटू लालरेम्सिआमी वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही मैदानात उतरली होती. 

मागील आठवड्यातील रविवारी हिरोशिमाच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी यजमान जपानचा ३-० असा धुव्वा उडवत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी मिझोरामची कन्या लालरेम्सिआमी बुधवारी कोलासीबी जिल्ह्यातील आपल्या गावी पोहचली.  लालरेम्सिआमी एएनआयशी बोलताना म्हणाली की, "सामन्यापूर्वीच मला वडिलांचे निधन झाल्याचे समजले. त्यानंतरही मी खेळण्याचा निर्णय घेतला. आम्ही चॅम्पियन ठरलो. माझे वडील जिथे कुठे असतील तिथे त्यांना माझा अभिमान वाटेल," असे ती भावूक सूरात म्हणाली. 

Women Hockey : चक दे इंडिया! फायनलमध्ये यजमान जपानचा धुव्वा

ह्रदयविकाराच्या झटक्याने लालरेम्सिआमीचे वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. ही बातमी समजल्यानंतर तिने संघासोबत राहण्याची भूमिका घेतली. उपांत्यफेरी आणि अंतिम सामन्यात खेळून वडिलांना श्रद्धांजली देऊ इच्छिते, असे तिने प्रशिक्षकांना सांगितले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:father died but I still played we became Champions Says Lalremsiami arrives in her village after winning FIH Womens Series Finals