पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिचाऱ्या अनुष्काचं नाव उगाच गोवलं, फारुख यांचा यु-टर्न

फारुख इंजिनीअर

विश्वचषकातील सामन्यात  निवड समितीमधील लोक अनुष्काला चहा आणून देताना मी पाहिले आहे, अशी टीका करणाऱ्या माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर  यांनी आता यु-टर्न घेतला आहे. बिचाऱ्या अनुष्काचं नाव यात उगाचच गोवलं, ती खूप चांगली मुलगी आहे. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. माझा बोलण्याचा रोख हा निवड समितीमधील काही लोकांकडे होता, अनुष्काकडे नाही असं ते एका खासगी वाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवर निशाणा साधताना माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा उल्लेख केला होता. विश्वचषकातील काही सामन्यादरम्यान निवड समितीमधील लोक अनुष्काला चहा आणून देताना मी पाहिले आहे, असे फारुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. 

IND vs BAN : दिल्लीतील प्रदूषणामुळे खेळ दूषित होणार नाही : रोहित शर्मा

मात्र नंतर रिपब्लिक टीव्ही या खासगी वाहिनीशी बोलताना  फारूख यांनी अनुष्काची माफी मागितली आहे. 'मी अनुष्कावर टीका केली नव्हती. तिला उगाच यात गोवलं गेलं. ती  आणि विराट कोहली हे दोघंही खूप  चांगले  व्यक्ती आहेत. माझ्या मनात तिच्याविषयी कोणतीही अडी नाही. माझ्या विधानामुळे तिला वाईट वाटलं असेल तर मी तिची मनापासून माफी मागतो. मी केवळ निवड समितीमधील लोकांवर टीका केली, जे आपलं कर्तव्य नीट बजावत नव्हते. याचा अनुष्का -विराटशी काही संबध नव्हता', असे फारुख म्हणाले. 

आजारातही जोकोविचनं प्रतिस्पर्ध्याला केलं बेजार

अनुष्कानं सर्वात आधी फारुख यांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 'विराट माझ्यातील नात्याला सुरुवात झाल्यापासून अनेकदा माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात आला. विराटच्या खराब कामगिरीचे खापर माझ्यावर फोडण्यात आले. मी ते शांतपणे सहन केले. अनुष्का शर्मा बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित असते, अशा अफवा पसरल्या गेल्या. संघ निवडीमध्ये माझा हस्तक्षेप असतो, असेही बोलले गेले. मला बीसीसीआयकडून खास पाहुणचार मिळतो. परदेशी दौऱ्यावर विराटसोबत जाण्यावरुनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. प्रोटोकॉलचे पालन करुन देखील माझ्यासंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचारावर मी शांत राहिले.  मात्र निवड समितीवर प्रश्न उपस्थित करताना त्यात माझ्या नावाचा उल्लेख करू नका, अशा गोष्टीत माझे नाव वापरण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही किंवा दिलेली नाही. एखादी व्यक्ती शांत आहे याचा अर्थ ती कमजोर आहे असे समजू नये', यासाठी मी माझ्या भावना व्यक्त केल्याचे अनुष्कानं ट्विटवर म्हटले. 

दीर्घकालीन रजेमुळे द्रविड दुहेरी लाभाच्या आरोपातून निर्दोष ठरणार?