पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गावाकडच्या आठवणी सांगत अजिंक्य म्हणाला, शेतकरीच रिअल हिरो

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला क्रिकेटप्रमाणेच देशातील शेतकऱ्यांचा आदर आहे. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्यासोबतच्या 'शिवार संसद एक युवा चळवळ' कार्यक्रमात त्याने शेतकऱ्याविषयीच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. संगमनेरच्या शेतामध्ये खेळल्याचा आफ्रिका दौऱ्यावर फायदा झाला, असा किस्साही त्याने यावेळी शेअर केला. गावाकडच्या आठवणींना उजाळा देताना रहाणे म्हणाले की, मला बैलगाडीत बसण्याची खूप आवड आहे. गावाकडे मी नांगरही चालवले आहे. 

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

मैदानात तग धरण्याच्या फंलदाजाबाबत नांगर टाकणे असा शब्द प्रयोग आपण नेहमी ऐकतो. अंजिक्य रहाणेला मैदानात नांगर टाकणारा खेळाडू असे म्हटले जाते. क्रिकेटच्या मैदानात संयमी खेळी करणाऱ्या अंजिक्यने शेतात नांगर चालवल्याचेही सांगितले. शेतकऱ्यामुळेच नांगर हा शब्द क्रिकेटमध्ये आलाय, असेही तो यावेळी म्हणाला. माझ्या गावाकडे आजी-काका शेतीच करतात. बाबा जेव्हा त्यांच्यासोबत फोनवर बोलायचे तेव्हा शेतकऱ्यांच्या किती अडचणी असतात, याची जाणीव झाली. 

...म्हणून आपल्या खेळाडूंना मॅक्सवेलसारखा निर्णय घेणं अशक्य: युवी

व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर गावाकडे अधिक जाणे झाले नाही. पण आपण जे काही आहोत ते शेतकऱ्यांमुळे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. टीव्हीवरील प्रसिद्ध वैगेरे शेतकऱ्यांसमोर काहीच नाही. शेतकरीच रिअल हिरो असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. देशाला त्याचा फायदा होईल, असे अजिंक्यने म्हटले आहे.  

विराट ठरला जगभरातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू

क्रिकेटमध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या हातात नसतो. त्याप्रमाणेच शेतीच ही असते. पाऊस हवा तेव्हा पडत नाही. आणि नको त्यावेळी पडतो.  परिस्थितीनुसार आपल्याला मार्ग काढवा लागतो. मी खेळायला येतो तेव्हा कधी कधी अवघ्या ३० धावांवर ३ गडी माघारी फिरलेले असतात तर कधी २०० धावा असताना मी खेळायला येतो. प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते. परिस्थितीती कोणतीही असो सकारात्मक रित्या पुढे जावे लागते, असा संदेशही त्याने शेतकऱ्यांना दिला.