पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटच्या 'डोन्ट व्हरी बी हॅप्पी' ट्विटनंतर शास्त्री ट्रोल

रवि शास्त्री आणि विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. संघाला विश्व विजेता बनवण्याचे स्वप्न अधूरे राहिल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना नेस्तानाभूत करण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. विंडीज दौऱ्यानंतर भारत दौऱ्यावर असलेल्या आफ्रिकेच्या संघाची टीम इंडियाने शिकार केली. पुण्याच्या मैदानातील दुसरा कसोटी सामना जिंकत भारताने आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानात रंगणार आहे. 

विराट सेनेच्या 'दादागिरी'तील कमजोरीकडे बोट

दरम्यान नुकताच विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. 'डोन्ट व्हरी बी हॅप्पी' अशी कॅप्शन त्याने या फोटोला दिल्याचे पाहायला मिळते. विराटच्या सोशल मीडियातील या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेटकरी विराटच्या पोस्टही रवि शास्त्रींसाठी आहे, असा मजेशीर तर्क लावत आहेत.

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा

सौरव गांगुली आणि रवि शास्त्री यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर शास्त्रींच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. हाच तर्क-वितर्क लढवून नेटकरी विराटच्या पोस्टचा संदर्भ शास्त्रींशी जोडून त्यांना ट्रोल करत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Fans Troll Ravi Shastri after Virat Kohali Post fan relate this post Sourav Ganguly takes over as BCCI president