पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फाफ ड्युप्लेसीनं दक्षिण आफ्रिकन संघाचे नेतृत्व सोडले

फाफ ड्युप्लेसीने दिली कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसीसने कसोटी आणि आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व हे क्विंटन डी कॉककडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२०- मालिकेत फाफ ड्युप्लेसीसला विश्रांती देण्यात आली होती. यावेळी क्विंटन डी कॉकनेच संघाचे नेतृत्व केले होते.   

तुझी बोटं छाटून टाकू; आर अश्विनला विरोधी संघाने दिली होती धमकी

फाफ ड्युप्लेसीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून १-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. फाफच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी ढिसाळ झाली होती. राजीनाम्यासंदर्भात फाफ ड्युप्लेसीस म्हणाला की, संघाला  आता नव्या नेतृत्वाची गरज आहे. नवीन चेहरे, नवीन आव्हानं आणि नव्या नेतृत्वासोबत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळत राहीन, असेही तो म्हणाला.  

रे हे काय झालं ?, विराटने शेअर केला पृथ्वी-शमीसोबतचा हा फोटो

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Faf du Plessis has stepped down as South Africa s Test and T20I captain Quinton de Kock has already replaced him as their full time ODI captain