पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हळूहळू निर्दयी बनत चालला आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केले आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडचा टी-२० सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर अख्तरने हे वक्तव्य केले. भारताने ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यजमान न्यूझीलंडचा ७ विकेटने पराभव केला. या विजयाबरोबरच मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. 

IPLची फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेतही बदल नाहीः सौरव गांगुली

अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, भारत निर्दयी संघ बनत चालला आहे. याचा पुरावा न्यूझीलंडला दुसऱ्या टी-२० सामन्यात दिसून आला. जर तुम्ही इतक्या कमी धावांवर बाद व्हाल. तेव्हा फलंदाजीची मोठी फळी असलेल्या भारतासारख्या संघाचा सामना तुम्ही कसा करणार, असा सवाल केला.

अख्तर म्हणाला की, कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टिलने खेळपट्टीवर टिकून खेळायला हवे हे मी आधीच सांगितले होते. ते खेळपट्टीवर टिकले नाहीत तर भारतीय टीमचा सामना करणे कठीण होईल.

रवींद्र जडेजाने मांजरेकरला केले ट्रोल, मिळाले हे उत्तर

क्रिकेटमध्ये हळूहळू प्रतिस्पर्धी संपत चालले आहेत. कारण संघ लढण्याची क्षमता दाखवत नाहीत. सध्या भारताचा संपूर्ण जगावर दबदबा आहे. पण दुसऱ्या संघांचे काय? जेव्हा ऑस्ट्रेलियाचा जागतिक क्रिकेटवर दबदबा होता. तेव्हा किमान भारत आणि पाकिस्तान त्यांना आव्हान तरी देत होते. आम्ही न्यूझीलंडमध्ये जे पाहत आहोत. ते पाहता यजमानांनी भारतासमोर शरणागती पत्करल्याचे दिसत आहे, असेही तो म्हणाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ex pakistani bowler Shoaib Akhtar Says Indian Team In Becoming Ruthless After Auckland 2nd T20 Win