पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिदीला पाचवे कन्यारत्न; चाहते म्हणाले, टीम तयार करणार का?

आपल्या नवजात मुलीसह शाहिद आफ्रिदी (छायाचित्रः शाहिद आफ्रिदी टि्वटर हँडल)

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने शुक्रवारी पाचव्या कन्यारत्नाची बातमी सोशल मीडियीवर शेअर केली. आफ्रिदीला यापूर्वी चार मुली आहेत. आता त्याने पाचव्या मुलीबरोबरील आपले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. 

त्याने आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, अल्लाचा आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर आहे. आधीपासूनच मला शानदार मुलींचा पिता होण्याचे सौभाग्य लाभले आहे. आता माझ्या घरी पाचवी मुलगी आली आहे. अलहमदुल्लाह ! ही खूशखबर मी आपल्या सर्व शुभचिंतकांबरोबर शेअर करत आहे. 

बीसीसीआयच्या एसीयूलाही करायची आहे संजीव चावलाची चौकशी, पण...

आफ्रिदीचे लग्न मामे बहीण नादियाबरोबर झाले होते. त्याला चार मुली असून त्यांची नावे अक्सा, अंशान, अजवा आणि अशमारा असे आहे. 

आफ्रिदीच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाबरोबर त्याला ट्रोलही केले आहे. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले की, पाकिस्तानमध्ये लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे. हे तुला केव्हा समजणार? चार मुली पुरेशा नाहीत का? की पुन्हा एका मुलाच्या इच्छेखातर मुलींची क्रिकेट टीम बनवायची आहे. जर तुला मुले पाहिजे असतील तर काही अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांना चांगले जीवन देऊ शकतो.

सचिनने दिला पहिल्या प्रेमाच्या आठवणीला उजाळा