पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयसीसीचा नियम पूर्वीपासूनचा, 'बाऊंड्री काउंट' वादावर मॉर्गनचा षटकार

इंग्लंड कर्णधार इयॉन मॉर्गन

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आयसीसीच्या बाऊंड्री काउंट नियमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसीद्वारे तयार करण्यात आलेल्या नियमांवर माझे किंवा संघाचे नियंत्रण नाही, हा नियम पूर्वीपासूनच आहे, अशा शब्दांत त्याने बाऊंड्री काउंट वादाच्या मुद्यावर चर्चा करणाऱ्यांना सुनावले आहे.  

इंग्लंडला एक फुकटची धाव मिळाली, माजी पंच टॉफेल यांनी वेधलं लक्ष

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना आणि सुपर ओव्हरमधील खेळ बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला जेतेपद मिळाले आहे. जगभरातून आयसीसीच्या या नियमावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने  १७ वेळा चेंडू सीमारेषेपलिकडे धाडला होता. तर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौकार आणि षटकार मिळून २२ वेळा चेंडू सीमापार केला होता.

#ICCRules : चेतन भगत यांनी केला आयसीसीच्या नियमाचा 'विनोद'

सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये प्रथम फंलदाजी करताना इंग्लंडने एका षटकात १५ धावा केल्या. न्यूझीलंडची गाडीही सुपर ओव्हरमध्ये १५ धावावर अडकली. सुपर ओव्हरमधील बरोबरीनंतर सर्वाधिक बाऊंडरी काउंटच्या नियमानुसार इंग्लंडने पहिला विश्वचषक आपल्या नावे केला.