पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL चा फायदा झाला, पाकच्या धुलाईनंतर जॉनीचे बोल

जॉनी बेअरस्ट्रो

पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तडाखेबाज शतक झळकवणाऱ्या जॉनी बेअरस्टोने आयपीएलमधील सहभागामुळे कामगिरीत सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक आणि स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोने काल (मंगळवारी) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ९३ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १२८ धावांची खेळी करत आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले ३५९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने चक्क ६ गडी आणि ५.१ षटके राखून सहज पार केले.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू बॅकपूटवरच!

या खेळीनंतर  जॉनी बेअरस्टो म्हणाला की, आयपीएलच्या बाराव्या हंगामात खेळणे माझ्यासाठी आनंददायी होते. या स्पर्धेत वेगवेगळे प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळाले. मैदानातील व्यूव्हरचना, उलट सुलट फटकेबाजी करण्यापेक्षा नियंत्रित खेळी कशी साकारता यईल, या सामान्य गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने शिकलो, असे जॉनी बेअरस्ट्रोने म्हटले आहे.

Video : पाकविरुद्ध बटलर बरसला, ५० चेंडूत शतकाला गवसणी

यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या ताफ्यातून मैदानात उतरलेल्या जॉनी बेअरस्ट्रोने १० सामन्यात ४४५ धावा कुटल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये ११४ धावांची खेळी करुन त्याने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रमही नोंदवला होता. पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या सामन्यासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमान इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:england vs pakistan jonny bairstow talks up ipl experience after demolishing pakistan attack in 3rd odi