पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या नीशमचे भारतीयांना अपील

जिमी नीशम

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जिमी नीशमने भारतीय चाहत्यांना आवाहन केले आहे. भारतीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट आयसीसीच्या अधिकृत स्थळावर विकण्याचे अपील केले आहे. चाहत्यांनी भारत अंतिम फेरीत दाखल होईल या आशेने मोठ्या संख्येने तिकीटांची खरेदी केली होती. विराट ब्रिगेड अंतिम फेरीत पोहोचणारच असा विश्वास चाहत्यांना होता. परंतु, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. त्यामुळे भारतीय चाहत्यांकडे एकतर सामना पाहायला जाणे किंवा ते तिकीट विकणे हाच पर्याय आहे. 

धोनीला ७ व्या क्रमांकावर का पाठवलं?, शास्त्रींनी सोडलं मौन
 
रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघात सामना होईल. नीशमने भारतीय चाहत्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या चाहत्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

नीशमने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, 'प्रिय भारतीय चाहते, जर तुम्ही अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये येऊ इच्छित नसाल तर कृपया आपले तिकीट अधिकृत मंचावरुन विका. मला माहीत आहे की, जास्त किंमतीने तिकीट विकणे हा फायद्याचा व्यवहार आहे. पण क्रिकेटच्या अस्सल चाहत्यांनाही संधी द्या, फक्त श्रीमंतांनाच नको.'

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया

आयसीसीनेही तिकीटाबाबत 'रिर्टन पॉलिसी' तयार केली आहे. त्याअंतर्गत चाहत्यांना आपले तिकीट परत देऊन संपूर्ण रक्कम घेता येते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:England vs New Zealand World Cup 2019 final Please give all genuine cricket fans a chance Jimmy Neeshams plea to Indian fans about reselling tickets