पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : क्रिकेटमध्ये नव्या नियमाची भर पडण्याचे संकेत

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील मालिकेपासून नवा नियम लागू करण्यात येणार असल्याची चर्चा

विश्वचषक स्पर्धेचा महासंग्राम संपल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशात खेळवणारी ही स्पर्धा अगदी भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्यांप्रमाणेच असते. १ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून क्रिकेटमध्ये नवा नियम लागू होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

INDvsWI: ३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

प्रत्येक संघासोबत आतापर्यंत क्षेत्ररक्षणासाठी असणारा अतिरिक्त खेळाडूला खेळण्याची परवानगी देण्यात येणार आहे.  
आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये हा नियम लागू करण्याबाबत चर्चा सुरु आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी मालिकेपासून हा नवा नियम अंमलात येईल, अशी आशा आहे. आगामी कसोटी विश्वचॅम्पियनशीपच्या दृष्टिने या नव्या नियमाकडे पाहिले जात आहे.  

ICC ODI Rankings : फलंदाजीत कोहली-रोहित तर गोलंदाजीत बुमराहचा दबदबा

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा मैदानात उसळता चेंडू लागून झालेल्या मृत्यूच्या दुर्घटनेपासून या नियमाचा समावेश करण्याबाबत विचार सुरु झाला. ह्यूजला २०१४ मध्ये स्थानिक क्रिकेटच्या एका सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्थानिक क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला होता. पण आस्ट्रेलियाच्या शेफील्ड शील्डमध्ये या नियमाचा समावेश करण्यात आला नव्हता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: england vs australia concussion substitutes set to make international debut in ashes 2019