पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 'अ‍ॅशेस' कसोटीच्या नावामागे दडलाय खास इतिहास

अ‍ॅशेस ट्रॉफी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एडबस्टनच्या मैदानातून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे. विश्वविजेता इंग्लंड संघाला घरच्या मैदानावर भारी ठरणार की ऑस्ट्रेलिया दमदार खेळ करत इंग्लंडला बॅकफूटवर टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. क्रिकेटच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेकडे अगदी भारत पाकिस्तान सामन्याप्रमाणेच युद्धासारखे पाहिले जाते. अ‍ॅशेस याचा अर्थ राख असा होतो. याकडे क्रिकेटच्या मैदानातील एक इतिहास म्हणून पाहिले जाते. 

१८८२ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ एकमेव कसोटीसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया ही इंग्लंडची वसाहत होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर धूळ चारली. या सामन्यात प्रथम फंलादाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या ६३ धावांत आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात १०१ धावा करत ३८ धावांची अल्प  आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात इंग्लंडने १२२ धावांत गुंडाळले. इंग्लंडला विजयासाठी केवळ ८५ धावांचे आव्हान होते. मात्र, इंग्लंडचा संघ ७७ धावांत ऑल आउट झाला. आणि हा सामना ऑस्ट्रेलियाने ७ धावांनी जिंकला होता. 

अ‍ॅशेस मालिका : आर्चरला संधी नाही, अशी असेल इंग्लंडची टीम इलेव्हन

२९ ऑगस्ट १८८२ या दिवशी ओव्हलरील पराभवला इंग्लिश प्रसारमाध्यमांनी इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाल्याची उपमा दिली होती. स्पोर्टिंग टाइम्सने लिहिले होते की, इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाला असून चितेला अग्नी देऊन ऑस्ट्रेलिया राख (अ‍ॅश) घेऊन जात आहे. त्यानंतर इंग्लंडने कर्णधार इवो ब्लिग यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात जाऊन  २-१ अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:england vs australia ashes 2019 know the grand history behind the name ashes eng vs aus test series