पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ASHES 2019 : चौथ्या कसोटीतील विजयासह कांगारु ठरले भारी

ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ ने आघाडीवर

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेत्या इंग्लंडला रोखत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ५६ गुणासह चौथ्या स्थानावर पोहचला आहे.

US Open 2019: नदालच चॅम्पियन, मेदवेदेवचा पराभव करत १९ वा ग्रँडस्लॅम पटकावला

चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथच्या दमदार द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ८ बाद ४९७ धावा करत आपला डाव घोषित केला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव कांगारु गोलंदाजांनी ३०१ धावांत आटोपला.  यात रॉरी बर्न्स (८१), कर्णधार जो रुट (७१) आणि जोस बटलरच्या ४१ धावांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाने १९६ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आघाडी कोलमडल्यानंतर या डावातही स्मिथने ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ६ बाद १८६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.

भारताविरुद्धच्या गोलंदाजीमुळे ब्रेथवेट पुन्हा गोत्यात

इंग्लंडला दुसऱ्या डावात ३८२ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र इंग्लंडचा डाव १९७ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १८५ धावांनी आपल्या नावे करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॉन डेन्लीने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. २००१ नंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडला बॅकफूटवर ठेवले आहे. पाचवा आणि अखेरचा सामना जिंकून इंग्लंड मालिकेत बरोबरी साधणार की ऑस्ट्रेलिया मालिका खिशात घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.