पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 : विराट वादानंतरही तेच अंपायर फायनलमध्ये!

इंग्लंडचे पंच नीजल लॉन्ज

आयपीएल स्पर्धेतील बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदावर झालेल्या एका सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचे पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर भडकलेल्या पंचांनी आपला राग खोलीच्या दरवाजावर काढला. त्यांनी चक्क लाथ मारुन दरवाजाच तोडल्याची घटना घडली होती. पंच नीजल लॉन्ज यांच्या या कृत्यावर बीसीसीआय नाराज आहे. असे असले तरी हैदराबादच्या मैदानात रंगणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात तेच पंच असतील, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले. 

शनिवारी बंगळुरुच्या मैदानात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रंगलेल्या सामन्यात नो बॉलच्या निर्णयावरुन पंच नीजल लॉन्ज आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. मैदानातील या घटनेचा राग लॉन्ज यांनी आपल्या खोलीच्या दरवाजावर काढला होता. या कृत्याबद्दल पंचांना सफाई द्यावी लागेल, पण याचा अंतिम सामन्यात त्यांना पंच म्हणून काम करण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

IPL 2019: ठरलं, या टीम खेळणार प्ले ऑफमध्ये

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर राव यांनी पंच नीजल लॉन्ज यांनी नुकसान भरपाईपोटी ५ हजार रुपये भरल्याची माहिती दिली आहे. नीजल लॉन्ज यांनी आतापर्यंत ५६ कसोटी, १२३ एकदिवसीय आणि ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेतही त्यांची पंच म्हणून काम पाहणार आहेत.