पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'रड्या' म्हणूनच स्मिथ लक्षात राहिल! इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा बाउन्सर

स्टीव्ह स्मिथ

यजमान इंग्लंड अ‍ॅशेस मालिका गमावण्याच्या वाटेवर दिसत असताना इंग्लंडच्या माजी गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील काळ्या दिवसाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. सध्याच्या घडीला लयीत असणाऱ्या स्मिथवर भाष्य करत त्याने चेंडू कुरतडल्याचे प्रकरण उकरुन काढले आहे. क्रिकेटच्या मैदानात स्मिथ कितीही भारी खेळला तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडून रडीचा डाव खेळल्याचा त्याच्यावरील ठपका कधीच पूसला जाणार नाही, असे स्टीव्ह हार्मिसन यांनी म्हटले आहे. 

ASHES 2019 : चौथ्या कसोटीतील विजयासह कांगारु ठरले भारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉल टॅम्परिंगमुळे  (चेंडू करतडल्याचे प्रकरण) स्मिथ नेहमी फसवेगिरी करणारा खेळाडू म्हणूनच लक्षात राहिल, असे हार्मिसन यांनी म्हटले आहे. हार्मिंसनने ‘टॉकस्पोर्ट ’ रेडिओ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की,  स्मिथला माफ केले जावू शकते, असे मला वाटत नाही. तुमच्या चारित्र्यावर एकदा फसवणूकीचा डाग लागला तर लोक तुम्हाला याच गोष्टीनं लक्षात ठेवतात. 

कांगारुंनी अ‍ॅशेस मारली तरीही विराट बिग्रे़डचं अव्वलस्थानी राहिल

जवळपास १८ महिन्यांपूर्वी तत्कालिन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यानंतर वर्षांच्या बंदीनंतर स्टीव्ह स्मिथने दमदार खेळ करुन चर्चेत आला. एवढेच नाही तर त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिय संघाने मालिकेत आघाडी देखील घेतली आहे. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत १३४ च्या सरासरीने ३ शतकासह ६७१ धावा केल्या आहेत. यात चौथ्या कसोटी सामन्यातील एका द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय यंदाच्या कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी देखील आहे.