पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, जोफ्राची स्पर्धेतून माघार

जोफ्रा आर्चर

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. यंदाच्या १३ व्या हंगामासाठी त्यांच्या ताफ्यासोबत असलेला जोफ्रा आर्चर आगामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. जोफ्रा आर्चरची दुखापतही राजस्थान रॉयल्ससह इंग्लंडचीही डोकेदुखी वाढवणारी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही तो उपलब्ध राहणार नाही. 

मास्टर ब्लास्टर सचिन दिल्ली मॅरेथॉनसाठी सज्ज

आयसीसीच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जोफ्रा एल्बो स्ट्रेस फॅक्चरमुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. या मालिकेसह आयपीएलमध्येही तो खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.  मागील हंगामात जोफ्रा आर्चरने राजस्थानकडून ११ सामन्यात ११ बळी मिळवले होते.

सामना गमावला पण भावनिक ट्विटनं श्रेयसनं मन जिंकली!

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात १९ ते ३१ मार्च या कालावधीत दोन कसोटी सामन्याची मालिका रंगणार असून या मालिकेत तो खेळणार नाही. २९ ते २४ मे या कालावधीत आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणून ही स्पर्धो खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 

जोफ्रा आर्चरशिवाय आगामी आयपीएलसाठी असा असेल राजस्थानचा संघ

आघाडीचे फलंदाज:
जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत.
फिनिशर: रियान पराग, डेविड मिलर.
अष्टपैलू : बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, शशांक सिंह. 
फिरकीपटू: श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, मयंक मारकंड्ये, अनिरुद्ध जोशी. 
जलदगती गोलंदाज : अंकित राजपूत, वरुण आरोन, जयदेव उनाडक, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, टॉम करन, एंड्रयू टाय.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:England fast bowler Jofra Archer has been ruled out of Test tour of Sri Lanka and IPL 2020 due to low grade stress fracture