पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅशेस मालिका : इंग्लिश चाहत्यांनी केलं डेव्हिड वॉर्नरला लक्ष्य

डेव्हिड वॉर्नर

एजबॅस्टनच्या मैदानात सुरु असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने १४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी पासून डेव्हिड वॉर्नरला डिवचण्याचा सुरु झालेला प्रकार या सामन्यातही पाहायला मिळाला. 

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२) आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट (८) दोघेही स्वस्तात माघारी फिरले. स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला चालते केले. वॉर्नर बाद होऊन तंबूत परतत असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी चक्क 'सॅण्ड पेपर' दाखवत वॉर्नरला निरोप दिला. २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात  डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणी दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली होती.  

विश्वचषकापूर्वी बार्मी आर्मीचा वॉर्नरला बाऊन्सर!

चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात एक वर्षांची शिक्षा आणि मानसिक त्रास सहन करुन ऑस्ट्रेलियाच्या संघात परतलेल्या डेव्हिड वॉर्नरवर विश्वचषकापूर्वीच शाब्दिक मारा करण्यात आला होता.  इंग्लंडमधील बार्मी आर्मीने चेंडू कुरतडल्याच्या आठवणींना उजाळा देत वॉर्नरला बाऊन्सर मारला होता. त्यांनी अधिकृत ट्विट अकाऊंटवरुन वार्नरला लक्ष्य केल होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या घटनांना सामोर जाण्यासाठी संघ तयार असल्याचे म्हटले होते. अ‍ॅशेस मालिकेत यापेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, यासाठी आम्हाला तयार रहावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. पहिल्याच सामन्यात याची प्रचिती आली.

धोनीबाबतच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचा मास्टर स्ट्रोक