पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची धास्ती: लंकेत इंग्लंडचे जंटलमन हास्तांदोलनाची प्रथा मोडणार

इंग्लडचा कर्णधार रुट

जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये सध्या भितीचे सावट पसरले आहे. कोरोनाचा परिणाम आता क्रिकेटवर झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाच्या भितीमुळे इंग्लड क्रिकेट संघाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे इंग्लडचे क्रिकेटपटू दुसऱ्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. इंग्लडचा कर्णधार रुटने याबाबतची माहिती दिली आहे. 

Video: माही-रैनाच्या गळाभेटीनं नेटकरी वेडावले

इंग्लंड क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. येत्या ७ मार्चपासून हा सामना सुरु होणार आहे. ७ ते ९ मार्चपर्यंत हा सामना खेळला जाणार आहे. कोरोनाच्या भितीमुळे या दौऱ्या दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडू श्रीलंकेच्या खेडाळूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. 

विराटच्या खराब कामगिरीवर इंझमाम यांनी दिली अशी प्रतिक्रिया

श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी इंग्लडचा कर्णधार रुटला कोरोनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने सांगितले की, हस्तांदोलन करण्याऐवजी आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंना बंद मुठीने अभिवादन करणार असल्याचे रूटने सांगितले. तसंच, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले होते. अनेकांना ताप आणि पोटदुखीचा सामना करावा लागला होता, असे रुटने सांगितले.  

ICC WT20 WC: सेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण