इंग्लंडच्या संघाला पहिला विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ट्रेव्हर बेलिस यांची हैदराबादच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ते टॉम मूडी यांची जागा घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ त्याच्या मार्गदर्शनाखालीच मैदानात उतरला होता.
आता मुख्य प्रशिक्षक निवडीवेळी विराटची मनमानी चालणार नाही
सनरायजर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन यासंदर्भातील घोषणा केली आहे. यापूर्वी ५६ वर्षीय बेलिस यांची कोलकता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ते आयपीएलच्या मैदानात सनरायजर्स हैदराबादचे मार्गदर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
#ENGvsNZ : किवी अष्टपैलूचा षटकार पाहून प्रशिक्षकांने सोडला प्राण
सनरायजर्स हैदराबादने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संघ मालकांनी विचारपूर्वक ट्रेव्हर बेलिस यांची प्रशिक्षक पदी निवड केली आहे. ते संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पाहतील. आयपीएलच्या मैदानात यापूर्वी त्यांनी कोलकता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने दोनवेळा आयपीएलच्या चषक पटकवला होता.
🚨Announcement🚨
— SunRisers Hyderabad (@SunRisers) July 18, 2019
Trevor Bayliss, England's WC Winning coach, has been appointed as the new Head Coach of SunRisers Hyderabad. #SRHCoachTrevor pic.twitter.com/ajqeRUBym5