पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर जोफ्राला विश्वचषकात संधी मिळेल!

जोफ्रा आर्चर

आगामी विश्वचषक तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा भरवशाचा फलंदाज अलेक्स हेल्स अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळला आहे. याप्रकरणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने त्याच्यावर २१ दिवसांच्या बंदीची कारवाई केली आहे. याशिवाय त्याला वार्षिक उत्पनाच्या ५ टक्के दंडही ठोठावला आहे. 

अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणात अडकण्याची त्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याच्यावर कारवाई झाली आहे. पुन्हा असे केल्यास आजीवन बंदी घातली जावू शकते. विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला त्याला मुकावे लागेल.

आगामी विश्वचषकासाठी इंग्लंडने जाहिर केलेल्या १५ सदस्यांच्या यादीतील हेल्स हा त्यांच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू आहे. या प्रकरणाचा तिढा आणखी वाढला तर त्याला आगामी विश्वचषकासही मुकावे लागू शकते. या परिस्थितीत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या आर्चर जोफ्राला इंग्लंडच्या ताफ्यात स्थान मिळू शकते. आगामी विश्वचषकासाठी इंग्लंडने अष्टपैलू जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिलेले नाही. त्याला वगळल्याने इंग्लंडच्या सर्वच माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते.