पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फुटबॉल स्किल दाखवत बटलरनं सरफराजला गंडवल

बटलर आणि सरफराज

आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्वत:ची विकेट वाचवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात रोहित शर्माने फुटबॉलची झलक दाखवली होती. याचीच प्रचिती पुन्हा एकदा क्रिकेच्या मैदानात पाहायला मिळाली. मात्र, यावेळी यष्टिरक्षकने फुटबॉल स्किल दाखवत फलंदाजाला तंबूत धाडल. 

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बटलरने फिरकीपटू मोईन अलीच्या गोलंदाजीवर सरफराजला आपल्यातील एक्स्ट्रा टॅलेंट दाखवत माघारी धाडले. विशेष म्हणजे सरफराज त्यावेळी ९७ धावांवर खेळत होता. पाकिस्तानच्या डावातील ३२ व्या षटकात इंग्लंडच्या कर्णधाराने मोईन अलीकडे चेंडू सुपूर्द केला. या षटकात ९७ धावांवर खेळणारा सरफराज मोईनचा चेंडू मारण्यासाठी पुढे आला.

VIDEO: धोनीचा निवृत्तीनंतरचा प्लॅन व्हायरल!
 

मोईन त्याला चकवा देण्यात यशस्वी ठरला. मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असल्याने आपल्याप्रमाणे यष्टिरक्षकला ही चेंडू चकवा देईल या विचाराने सरफराजने क्रिझ सोडले. मात्र यावेळी बटलरने पायाने चेंडूवर नियंत्रण मिळवत अप्रतिम यष्टिचित करत सरफराजला माघारी धाडले. जोस बटलरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
पाच सामन्यातील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर उर्वरित चारही सामने जिंकत इंग्लंडने ही मालिका ४-० अशी खिशात घातली आहे. 
 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:eng vs pak jose buttler show football skills to sarfaraz ahmed run out Watch viral video