ICC World Cup 2019 Final, England vs New Zealand: सुमारे दीड महिन्याच्या रोमांचक प्रवासानंतर आता आयसीसी विश्वचषकाचा समारोप होणार आहे. लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड यांच्यादरम्यान रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात विजय कोणाचाही झाला तरी इतिहासात त्याची नोंद होणार हे निश्चित आहे. सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या केन विल्यम्सनची नजर किवी टीमला पहिल्यांदा किताब पटकावून देण्याकडे आहे. तर इयॉन मॉर्गनवर इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा चॅम्पियनचा किताब मिळवून देण्याचा दबाव आहे.
धोनीला ७ व्या क्रमांकावर का पाठवलं?, शास्त्रींनी सोडलं मौन
ICC Cricket World Cup 2019: England and New Zealand to face-off in the final at Lord's in London, today. #CWC19 pic.twitter.com/okFWONGgsO
— ANI (@ANI) July 14, 2019
इंग्लिश टीमवर मानसिक दबाव आहे. कारण क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या या देशाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी तब्बल २७ वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही संधी गमवायची नाही, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. न्यूझीलंडसाठी विश्वचषक मालिका मोठ्या चढ-उताराची राहिली आहे. त्यांनी एकदिवसीय सामन्यातील क्रमांक एकची टीम आणि साखळी सामन्यात शानदार कामगिरी करुन अव्वल स्थानी राहिलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाची धूळ चारुन अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सेमीफायनलमध्ये पात्र ठरणे न्यूझीलंडला मुश्किल झाले होते.
ICC WC 2019: फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या नीशमचे भारतीयांना अपील
आम्ही अंतिम सामन्यासाठी तयार- केन विल्यम्सन
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने या विश्वचषकात २ शतक आणि २ अर्धशतके ठोकली आहेत. मालिकेत ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने ८ डावांत ५४८ धावा केल्या आहेत. विल्यम्सनने म्हटले आहे की, इंग्लंड प्रबळ दावेदार आहे. पण आम्हीही या सामन्यासाठी तयारी केली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे आमचे लक्ष क्रिकेटवर आहे. कोणीही कोणालाही पराभूत करु शकतो. सामन्यादरम्यान तुमच्यावर अनेक प्रकारचे दबाव येतात. आम्ही त्या सर्व दबावांचा सामना करण्यासाठी तयार आहोत.
रविवारी आम्ही इतिहास रचू शकतोः इयॉन मॉर्गन
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने या मालिकेतील ९ डावांत ३६२ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने मालिकेत २२ षटकार लगावले आहेत. तो म्हणाला, न्यूझीलंड संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांना पराभूत करणे कठीण आहे. रविवार असा दिवस आहे, की त्यादिवशी आम्ही इतिहास रचू शकतो. पण कोणताही संघ कोणालाही पराभूत करु शकतो. अशावेळी आपले पाय जमिनीवर ठेवणे आणि येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करणे खूप महत्वाचे आहे.
पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया
पिच रिपोर्ट
नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करु शकतो. गोलंदाजांना मदत मिळेल.
हवामान
पावसाची कोणतीच शक्यता नाही.
लॉर्ड्सच्या नोंदी
इंग्लंडने येथे ५४ एकदिवसीय सामने खेळले. यात २४ विजय, २७ पराभव. २ बरोबरीत, १ अनिर्णित
न्यूझीलंडने या मैदानावर ५ एकदिवसीय सामने खेळले. त्यातील ३ मध्ये विजय, एकात पराभव आणि १ सामना अनिर्णित राहिला.
न्यूझीलंडने या मैदानावर इंग्लंडविरोधात ३ सामने खेळले. त्यातील २ सामन्यात विजय तर १ अनिर्णित राहिला.