पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जर-तर मध्ये फसला पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा आहे मार्ग

जर-तर मध्ये फसला पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा आहे मार्ग

विश्वचषकातील ४१ व्या सामन्यात या किताबाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंड विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतने यापूर्वीच सेमीफायनलमध्ये स्थान पटकावले आहे. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे, जे सेमीफायनलमध्ये जागा मिळवू शकतात. पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या स्पर्धेत आहे. पण त्यांचा मार्ग कठीण आहे. 

पाकचा पुढचा सामना बांगलादेशबरोबर पाच जुलै रोजी आहे. जर त्यांनी बांगलादेशला पराभूत केले तर त्यांचे ११ गुण होतील. अशावेळी न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे गुण समान होतील. समान गुण झाले तर सेमीफायनलचा निर्णय नेट रनरेटच्या आधारे होईल.

रायडूच्या निवृत्तीवर गंभीर यांची 'खंबीर' भूमिका

बुधवारी इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ धावांनी पराभव करुनही पाकचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नसेल. दुसरीकडे, न्यूझीलंडचे पराभवानंतरही सेमीफायनलमध्ये पोहोचणे निश्चित आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडच्या तुलनेत नेट रनरेट सुधारण्यासाठी बांगलादेशला सुमारे ३२५ धावांनी पराभूत करावे लागेल, जे असंभव वाटते. 

पहिले समीकरण असे असेल की, पाकिस्तानने ३५० धावा केल्या तर त्यांना बांगलादेशला ३१२ धावांनी पराभूत करावे लागेल. दुसऱ्या समीकरणानुसार जर पाकने ४०० धावांचा आकडा गाठला तर त्यांनी बांगलादेशचा ३१६ या विशाल धावसंख्येने हरवावे लागेल.

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'

याचाच अर्थ पाकला प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा करुन बांगलादेशचा संपूर्ण संघ ८४ धावांवर गुंडाळावा लागेल. याची शक्यताही कमी आहे. म्हणजेच पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. त्यामुळे विश्वचषक २०१९ मधून त्यांचा संघ बाद होणे निश्चित आहे.

नंतर फलंदाजी केल्यास शक्यताच नाही
जर नंतर फलंदाजी करण्याची वेळ पाकवर आल्यास सेमीफायनलमध्ये जाण्याचे कोणतेच मार्ग त्यांना उपलब्ध होणार नाहीत. एक धावांचेही लक्ष्य असले तरी पाकला सेमीफायनलमध्ये स्थान नाही.

असा 'जबरा फॅन' पाहिला नाही, विराटनं घेतले आजींचे आशीर्वाद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:eng vs nz icc cricket world cup 2019 here is full scenario how pakistan can make into semifinal against bangladesh match