पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयर्लंडची कमाल! वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला ८५ धावांत गुंडाळले

ऑयर्लंड संघाची कमाल

ENG vs IRE England vs Ireland Test Match: वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात चार दिवसांच्या कसोटी सामना सुरु आहे. लॉर्डसच्या मैदानात पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ८५ धावांत आटोपला. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  वर्ल्ड चॅम्पियन संघाची फलंदाजीला ऑयर्लंडच्या टीम मुर्ताघ याने सुरुंग लावला.

जेसन रॉयला त्याने अवघ्या ५ धावांवर तंबूत धाडले. जो डेनलीने इंग्लंडकडून सर्वाधिक २३ धावा केल्या. जॉनी बेअरस्ट्रो, मोइन अली, क्रिस वोक्स यांना खातेही उघडता आले नाही. तळाच्या फलंदाजीतील सॅम कुरेन (१८) आणि ओली स्टोन (१९) धावा केल्या तर जॅक लीच १ धावेवर नाबाद राहिला. 

 

ड्रेसिंगरुममध्ये दादागिरीची संस्कृती नाही : कोहली

आयर्लंडकडून टीम मुर्ताघने कारकिर्दीत पहिल्यांदा ५ विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या बाजूने मार्कने ३ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. ऑयर्लंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ २३.४ षटकात ८५ धावांत आटोपला. नवख्या आयर्लंडच्या ही कामगिरी सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकणारी अशीच आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: eng vs ire 4 ireland tour of england 2019 only test match at lords cricket ground live cricket scorecard live test match day 1