पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : इंग्लंडची टीम हारली, पण स्टोक्सनं चाहत्यांची मनं जिंकली

बेन स्टोक्स

अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत निसटलेला सामना इंग्लंडच्या पारड्यात टाकणारा अष्टपैलू चौथ्या कसोटीत संघासाठी बहारदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात स्टोक्स अवघ्या १ धावेवर बाद झाला. तरीही त्याने पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.  

via Gfycat

स्टोक्सच्या रुपात इंग्लंडने आपली चौथी विकेट गमावली. कमिंन्सच्या एका चेंडूवर स्टोक्स टीम पेनच्या हाती झेल देत बाद झाला. विशेष म्हणजे कमिंन्स आणि ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार अपील केल्यानंतर पंचांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पण स्टोक्सने पंचांच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता तंबूचा रस्ता धरला. आपल्या या निर्णयामुळे त्याने प्रामाणिकपणाची एक उदाहरण दाखवून दिले. 

सलालोचक मायकल होल्डिंग यांना देखील स्टोक्सच्या या निर्णयाने हैराण केले.  पंचांनी आपला निर्णय देण्यापूर्वीच स्टोक्सने मैदान सोडले. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानात असे दृष्य फार कमी प्रमाणात पाहायला मिळते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:eng vs aus ashes 2019 Ben Stokes Walks Despite Umpire Ruling Him Not Out to Leave Old Trafford in Shock watch video here england vs australia