पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक वकार युनिस यांनी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऋषी कपूर यांचे आपल्यातून निघून जाणे हा एका युगाचा अंत आहे, अशा शब्दांत वकार युनिस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वकार युनिस यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'हर्ट ब्रोकन। जागतिक चित्रपटसृष्टीसाठी हा भयावह आठवडा आहे. तुमच्या निधनामुळे एका युगाचा अंत झालाय, तुम्ही आमच्या ह्रदयात सदासर्वकाळ जिवंत असाल. मी कपूर कुटुंबियांच्या दुख:त सहभागी आहे, असे वकार यानी म्हटले आहे.
दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. ऋषी कपूर आस-पास असताना वातावरणात नेहमी उत्साह अहसायचा. प्रत्येक मिनिटाला ते हसवत राहायचे. मी नीतूजी, रणबीर आणि रिद्धिमा यांच्या दुख:त त्यांच्या सोबत आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने देखील ट्विटच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
हे वर्ष आणि हा आठवडा खूप भयावह आठवणींचा आहे, अशा शब्दांत सानियाने ऋषी कपूर याना आदरांजली वाहिली. गुरुवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांच्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी कलाविश्वातून दुख:द बातमी आली. ऋषी कपूर आपल्यातून निघून गेल्याचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटवरुन सांगितले.