पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : ऑस्ट्रेलियन महिलांच्या गोलंदाजीवर सचिनची फटकेबाजी

सचिनने ऑस्ट्रेलिय महिला गोलंदाजीचा सामना केल्याचे पाहायला मिळाले.

विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर तब्बल साडे पाच वर्षानंतर पुन्हा एकदा बॅट हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियातील जंगलामधील जळीत कांडातील पीडितांच्या मदतीच्या उद्धेशाने आयोजित करण्यात आलेल्या बुशफायर क्रिकेट बॅश या स्पर्धेत सचिनने फटकेबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी त्याने ऑस्ट्रेलियन महिला संघातील खेळाडूंच्या गोलंदाजीवर खेळल्याचे पाहायला मिळाले. 

Video : एकमेकांना धडकूनही बहाद्दर सुखरुप क्रिजमध्ये पोहचले

ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाज एलिस पेरी आणि एनाबेल सुथरलँड हिने सचिनला गोलंदाजी केली. दोघींनी मिळून सचिनला एक षटक फेकले. यात  पेरीने सचिनला चार चेंडू फेकले. ज्यात तेंडुलकरने दोन चौकार खेचले. यावेळी सचिनच्या भात्यातून स्ट्रेट ड्राईव्ह आण कव्हर ड्राईव्ह लगावले. पेरिनंतर सचिनने एनाबेलाच्या दोन चेंडूचा सामना केला. तिच्या अखेरच्या चेंडूवर सचिनच्या भात्यातील स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. एलिसच्या पहिल्या चेंडूवर सचिनने लेग ग्लांसवर चौकार लगावला. दुसऱ्या चेंडू त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने दोन धावांसाठी टोलवला. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात एलिसाला यश आले. चौथ्या चेंडूवर स्क्वेअरकच्या रुपात सचिनने चौकार मारला. यानंतर सचिनने साडेपाच वर्षानंतर पहिल्यांदा बॅट हातात घेतल्याचे सांगितले.  

..आणि सचिन तेंडुलकरने स्वीकारले महिला क्रिकेटपटूचे चॅलेंज 

ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी बुशफायरमुळे लाखो जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली होती. आगीमुळे अनेक घरांची राखरांगोळी झाली. या हानीमुळे नुकसान झालेल्यांना दिलासा देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये एक सामना आयोजित केला आहे. हा सामना पॉटिंग इलेव्हन विरुद्ध गिलख्रिस्ट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी ब्रेकच्या वेळेत सचिनने ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली.