पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुती चंद 'टाइम 100 नेक्स्ट'च्या यादीत, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

दुती चंद

भारताची आघाडीची धावपटू दुती चंद हिने टाइम १०० नेक्स्टच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिच्या या भरारीबद्दल ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुतीचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, संपूर्ण राज्याला तिच्या कामगिरीचा अभिमान आहे. टाइम मॅग्जिनच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल दुतीचे खूप खूप अभिनंदन! 

खेळापेक्षा खासगी आयुष्याला मिळणाऱ्या अधिक महत्त्वामुळे दुती चिंतेत

पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देखील दुतीच्या या अनोख्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सर्वात वेगाने धावणाऱ्या महिलेने आता टाइम १०० नेक्स्टच्या यादीत मानाचे स्थान मिळवले होते. खेळाच्या मैदानासोबत इतर क्षेत्रातही ती देशाचे नाव उंचावेल, अशा शब्दांत त्यांनी दुतीवर कौतुकाचा वर्षाव केला.  

समलैंगिक असल्याचं जाहीरपणे कबुल करणाऱ्या दुतीचं एलेनकडून कौतुक

दुतीने जकार्ता आशियाई क्रिडा प्रकारात १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. नपोली येथील यूनिवर्सिटी क्रीडा प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू ठरली होती. दोहा विश्व चॅम्पियनशीपमध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यत प्रकारात तिने ११.४८ वेळ नोंदवली. या स्पर्धेत तिला अपयशाचा सामना करावा लागला होता.