पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून दुती आणि हरभजन राष्ट्रीय पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर

दुती चंद आणि हरभजन सिंग

केंद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी खेळाडूंची यादी तयार करण्यात येत आहे. महिला धावपटू दुती चंद अर्जुन पुरस्कार तर क्रिकेटर हरभजन सिंग खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत होते. मात्र, क्रिडा मंत्रालयाने या दोघांच्या नावे यादीत सामाविष्ट करुन घेतली नसल्याचे समोर आले आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने दोन्ही खेळाडूंच्या नावांची शिफारसही मुदत संपल्यानंतर केली होती. या कारणामुळे दोघांना प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी निर्धारित मुदतीवेळी दुती चंद आवश्यक रँकिंग प्राप्त नसल्यामुळे तिच्या नामांकन अंतिम यादीसाठी अपात्र ठरले. अ‍ॅथलॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून मंत्रालयाला मिळालेल्या रँकिंगनुसार, दुती चंद पाचव्या रँकिंगवर होती.  

Video : युवीचा अप्रतिम षटकार, पाक गोलंदाज 'बेहाल'

दुती चंद एएनआयशी बोलताना म्हणाली की, नामांकन रद्द करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. त्यांनी विश्व युनिवर्सिटी गेम्समधील सुवर्ण पदकाच्या कामगिरीच्या उल्लेखासह अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा शिफारस केली होती.  २०१३ पासून सातत्यपूर्ण चांगली खेळी करत असल्याचा उल्लेखही दुती चंदने यावेळी केला.

BCCI च्या हस्तक्षेपानंतर शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा! 

हरभजन सिंगने १०३ कसोटी २३६ एकदिवसीय आणि २८ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने कसोटीत ४१७ बळी आणि २ हजार २२४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात २६९ बळी आणि टी-२० मध्ये २१ बळी मिळवले आहेत. हरभजनने २०१६ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळळा होता.