विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दितील पहिला वहिला विश्वचषक पटकावला. लॉर्डसच्या मैदानात इंग्लंडच्या जो रुट आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्याची फायनल संधी होती. मात्र ही दोघही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम अद्यापही कायम राहिला आहे.
टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात
२००३ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे सचिनला गोल्डन बॅट मिळाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत भारताचा सलामीवीर आणि उप-कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर (६४७), शाकिब अल हसन (६०६) आणि केन विल्यम्सन (५७८) आणि जो रुट (५५६) धावांसह पहिल्या पाचमध्ये आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सेमीफायनलमधील पराभवानंतर रोहित अन् वॉर्नर तेंडुलकरच्या विक्रमाचा पाठलाग करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले.
रोहितकडे वनडे अन् कोहलीकडे कसोटी नेतृत्वाच्या प्रयोगाचे संकेत
त्यानंतर फायनलमध्ये खेळणाऱ्या जो रुट आणि विल्यम्सनकेडे मोठी धावसंख्या उभारुन सचिनचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढण्याची एक संधी होती. पण अखेर हायहोल्टेज सामन्यात त्यांना ते जमले नाही. केन विल्यम्सनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.