पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ती' खुश तर 'मी' खुश हे मला कळलंय : धोनी

महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी

भारतीय संघाचा माजी कर्णधार क्रिकेटच्या मैदानात कर्णधार नसतानाही संघाचे नेतृत्व करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. संघातील सहकारी खेळाडूंसह कर्णधार विराट कोहलीलाही आपण वेळोवेळी धोनीचा सल्ला घेताना पाहिले आहे. धोनीला क्रिकेटच्या मैदानातील निर्णयाचा बादशहा म्हटले तर वावगे ठरणार नाही. मैदानात आपल्या हुकमाने अधिराज्य गाजवणाऱ्या धोनीने आपल्या आयुष्यातील जोडीदारासोबतचे काही किस्से शेअर केले आहेत. 

...म्हणून लेकासाठी सचिनने केली ट्विटर इंडियाला विनंती

मैदानात आपल्या निर्णयाने मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या धोनीने घरासंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पत्नी साक्षीला दिले आहेत. पत्नीच्या कोणत्याही निर्णयानंतर रिव्ह्यूचा वापर करत नाही, असे खुद्द धोनीने एका कार्यक्रमात सांगितले. 'ती खुश तर मी खुश' अशा शब्दात त्याने पत्नीच्या निर्णयात हस्तक्षेप करत नसल्याचे म्हटले. एका ऑनलाइन विवाह पोर्टलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात धोनीने आयुष्यातील जोडीदाराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

INDvsWI T20 Series 'गब्बर'च्या दुखापतीनंतर संजूला मिळाला 'न्याय'

धोनी म्हणाला की, मी एक आदर्श पती आहे. 'ती खुश तर मी खुश' हे मला समजले आहे. माझी पत्नी तेव्हाच खुश राहील जेव्हा मी तिच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणेन. लग्नापूर्वी प्रत्येक पुरुष शेर असतो, असेही तो विनोदी अंदाजात म्हणाला. वाढत्या वयानुसार नाती मजबूत होतात. लग्नाचा गोडवा हा वयाच्या पन्नाशीत असतो. वयाच्या ५५ व्या वर्षी तुमची दिनचर्या बदलते. त्यावेळी प्रेमाची खरी परीक्षा असते, असेही धोनीने म्हटले आहे. भारतीय संघाला दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी २०१० मध्ये साक्षीसोबत विवाहबद्ध झाला होता.