पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जुने सामने पाहून कंटाळलोय! खेळ पुन्हा सुरु करायला हवा : ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणूने जगभरातील खेळ स्पर्धेला ब्रेक लावला आहे.  अनेक राष्ट्रांवर लॉकडाउनची सध्याच्या घडीला लॉकडाउनची नामुष्की ओढावली असून खेळ आयोजक जुन्या सामन्यांच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये निर्माण होणारी दुराव्याची दरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात क्रिकेटच्या सामन्याला महत्त्व दिले जात असून अमेरिकेत बेस बॉलच्या जुने सामने दाखवण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील खेळ पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टिने पावले टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. १४ वर्षांपूर्वीचे सामने पाहून कंटाळा आला असून खेळ  सुरु करण्याची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

'IPL साठी PCB आशिया चषक रद्द करण्यास 'राजी' होणार नाही'

उताह  झाजचा रूडी गोबर्ट याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एनबीए (नेशनल बास्केटबॉल लीग) स्पर्धा ११ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर एनएचएल (नेशनल हॉकी लीग), मेजर लीग सॉकर (एमएलएस) आणि यूएस पीजीए टूर या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या होत्या. एनबीए आणि एनएचएल अखेरच्या टप्प्यातील स्पर्धा सुरु करण्याबाबत विचार करत आहे. याशिवाय बेसबॉल लीगही सुरु करण्याबाबत अमेरिकेत सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत मिळत आहेत.   ईएसपीएनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार,  मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) हंगामातील सामने जपानमध्ये सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  

पंतप्रधान मोदी २६ एप्रिलला 'मन की बात'मधून साधणार जनतेशी संवाद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Donald Trump urges sports return says he is tired of watching baseball games that are 14 years old