पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनच्या कौतुकानंतर 'त्या' दिव्यांग मुलानं व्यक्त केल्या मनातील भावना

सचिनने दिव्यांग मुलाच्या व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे.

दिव्यांग मड्डाराम कवासी या मुलाचा क्रिकेटच्या मैदानात आपल्या मित्रांसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्यातील क्रिकेटबद्दल असणारे प्रेम आणि खेळाबद्दलचा जज्बा पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारावून गेला आहे. सचिनने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन दिव्यांग मड्डाराम कवासी नावाच्या मुलाचा व्हिडिओ शेअर करत हा मुलगा प्रेरणेचं स्त्रोत आहे, असे म्हटले आहे.  

या पाच दिग्गज क्रिकेटर्सच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

या व्हिडिओमध्ये दिव्यांग मड्डाराम शारीरिक उणीवावर मात करुन मित्रांसोबत अप्रतिमरित्या क्रिकेट खेळताना दिसते. हा व्हिडिओ प्रेरणादायी असल्याचे सचिनने म्हटले आहे. नक्षलीभागातील दंतेवाडा जिल्ह्यातील कटे कल्याण विकासखंड येथील बेंगळुरु गावातील 13 वर्षीय मड्डाराम सातवी इयत्तेत शिकतो.  पायाच्या अपंगत्वावर मात करुन हा मुलगा क्रिकेटच्या मैदानात अप्रतिम खेळताना दिसला. त्याच्या मित्रांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

WWE 24*7 चॅम्पियनशिप : काही क्षणाचा चॅम्पियन!

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर मड्डाराम कवासी याने  हिंदुस्थान लाइव्हला प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने माझा व्हिडिओ शेअर करणे अभिमानास्पद आहे. सचिनने आमच्या गावाला भेट द्यावी, अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा मानस असल्याची भावनाही त्याने यावेळी व्यक्त केली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:divyang madda ram kawasi wants to become doctor in future cricket viral video shared by sachin tendulkar