पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करुणारत्ने! वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पाचवा फंलदाज

करुणारत्ने

विश्वचषकातील चेस्टर ली स्टीटच्या मैदानात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना नाणेफेक जिंकून आफ्रिकेच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत कासिगो रबाडावे पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेला बाद केले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर बाद होणारा करुणारत्ने दुसरा फंलदाज ठरला. 

यापूर्वी न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तिलवर खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर तंबूत परण्याची नामुष्की ओढावली होती. वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलने त्याला बाद केले होते. विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा पराक्रम हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज क्रेग मॅकडर्मॉट याच्या नावे आहे. १९९२ मध्ये न्यूझीलंडच्या जॉन राइट यांना पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले होते.  

२००३ च्या विश्वचषकात बांगलादेशच्या हन्नान सरकारला श्रीलंकन पीटरमैरिट्सबर्गनं पहिल्या चेंडूवर बाद केले होते. तर २०११ मध्ये झिम्बाब्वेच्या बी टेलरला कॅनडाच्या खुरम चोहनने खातेही उघडू दिले नव्हते.

Video : धोनी-सरफराजच्या 'सेम टू सेम' झेलची चर्चा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dismissed first ball of a WC match John Wright 1992 against Australia Rabada to Karunaratne Sri Lanka vs South Africa Match