पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताला धक्का; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीला स्थान नाही

नेमबाजी (Burhaan Kinu/HT PHOTO)

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या (सीजीएफ) एका निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. सीजीएफने बर्मिंगहम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी क्रीडा प्रकार हटवला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत भारताने नेहमीच पदकांची लयलूट केलेली आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे आयोजित या स्पर्धेत भारताने ६६ पदके पटकावली होती. त्यापैकी १६ पदके केवळ नेमबाजीत मिळवले होते. २०१८ मध्ये भारत या खेळात तिसऱ्या स्थान होता. 

ISSF Shooting World Cup सुवर्ण वेध साधत राहीने मिळवला ऑलिम्पिक कोटा

नेमबाजी खेळ हटवल्याने भारताच्या पदकांवर मोठा फरक पडणार आहे. संघटनेचे सचिव राजीव यांनी याबाबत माहिती दिली. या खेळाचा समावेश व्हावा म्हणून भारताने मोठे प्रयत्न केले. परंतु, आयोजक आपल्या निर्णयावर ठाम होते. हा फक्त नेमबाजीला नव्हे तर संपूर्ण भारताला मोठा धक्का आहे. पदतालिकेत भारत नेमबाजीमुळे वरच्या स्थानावर असतो. 

नेमबाज अपूर्वी चंडेला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी