पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वयाच्या ४२ व्या वर्षी दिनेश मोंगियाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

दिनेश मोंगिया

टीम इंडियाचा माजी फलंदाज दिनेश मोंगियाने १७ सप्टेंबर २०१९ रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. २००१ मध्ये टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने आपला अखेरचा सामना १२ मे २००७ रोजी बांगलादेश विरोधात खेळला होता. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर सुमारे १२ वर्षांनंतर त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून सन्यास घेतला आहे. आयसीएल क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाल्याने मोंगियावर भारतीय क्रिकेट मंडळाने बंदी घातली होती.

वर्ष २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात व्हीव्हीएस लक्ष्मण ऐवजी दिनेश मोंगियाची संघात निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत टीम इंडिया उपविजेती ठरली होती. पंजाबच्या मोंगियाने १९९५-९६ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. डाव्या हाताच्या या फंलदाजाने इंग्लिश कौंटीमध्ये आपल्या फिरकीने चमकदार कामगिरी केली होती.

PKL : एकमेकांविरुद्ध 'पंगा'घेणाऱ्या मंडळींनी मारला 'मिसळ-पाव'वर ताव

२००४ मध्ये लँकशायरमध्ये त्याला स्टुअर्ट लॉच्या जागेवर करारबद्ध करण्यात आले होते. त्याने लँकशायरकडून ११ सामने खेळले. मोंगियाने १२१ प्रथमश्रेणी सामन्यात ८०२८ धावा केल्या. त्याची सरासरी ४८.९५ होती. ३०८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीत २७ शतके आणि २८ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.

त्याने अ श्रेणीच्या १९८ सामन्यात १० शतके आणि २६ अर्धशतकांसह ५५३५ धावा केल्या आहेत. २००१ मध्ये पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पदार्पण केले होते. झिम्बाब्वेविरोधात त्याने १४७ चेंडूवर नाबाद १५९ धावांची खेळी केली होती.

आफ्रिकेचा कर्णधार म्हणतो, कोहली-रबाडाची 'टशन' पुन्हा पाहायला मिळेल

२००३ च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात त्याच्या क्रिकेट तंत्रातील उणिवा समोर आल्या. २००५ मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. २००७ मध्ये त्याने आपला अखेरचा सामना बांगलादेशविरोधात खेळला होता. २००६ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकमेव टी-२० सामना खेळला. त्याने ५७ एकदिवसीय सामन्यात १२३० धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

एकमेव टी-२० सामन्यात त्याने ३८ धावा केल्या. इंडियन क्रिकेट लीगशीही (आयसीएल) त्याचा संबंध आला. नंतर तो पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या निवडसमितीत होता. बासीसीआय आता त्याच्याशी प्रशिक्षण करार करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जाते.

गेलच्या महाबली विक्रमापर्यंत पोहचणे 'मुश्किलच'