पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून धोनीने जागा घेतल्याची कार्तिकला कधीच खंत वाटत नाही

महेंद्रसिंह धोनीच्यापूर्वी दिनेश कार्तिकने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरु केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात १५ वर्षांपूर्वी पदार्पण करुन देखील भारतीय संघात नेहमी आत-बाहेर राहिलेल्या दिनेश कार्तिक नेहमीच चर्चेत असतो. चर्चेत रहायला तसं सर्वांनाच आवडतं पण काहीवेळा वाईट चर्चेमुळे लोक दुखावले जातात. दिनेश कार्तिक मात्र त्याला अपवाद आहे. लोक माझ्याबद्दल चांगले किंवा वाईट काही बोलले तरी मी माझा स्वभाव बदलत नाही, असे त्याने म्हटले आहे.  

आगामी विश्वचषकासाठी युवा ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांना वगळून भारतीय निवड समितीने दिनेश कार्तिकची निवड केल्यानंतरही तो चर्चेत आला होता. यष्टिमागे चांगली कामगिरी करण्याची कार्तिकमध्ये क्षमता असल्याचे सांगत निवड समितीचे प्रमुख एमकेप्रसाद यांनी त्याच्याबद्दल सुरु असलेल्या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला होता. 

कोहलीने उलगडले कार्तिकच्या निवडीचे 'राज'

कार्तिकने इंग्लंड दौऱ्यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. तो म्हणाला की, 'कुटुंबिय आणि मित्रपरिवाराचे आशिर्वाद नसते तर मी आजही क्रिकेट खेळताना दिसलो नसतो. लोक माझ्याबद्दल चांगले किंवा वाईट बोलत असले तरी मी शांत राहतो. मला स्वाभाविकपणे जगणे आवडते. त्यामुळेच मी अद्यापही भारतीय संघाचा घटक आहे, असे कार्तिकने म्हटले आहे.  

कार्तिकने महेंद्रसिंह धोनीपेक्षाही अगोदर भारतीय संघात स्थान मिळवले होते. धोनी नसता तर तो अनेक सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना नक्कीच दिसला असता. मात्र एका विशेष आणि दर्जेदार खेळाडूमुळे बाहेर बसावे लागल्यामुळे त्याला या गोष्टीचे कधीच वाईट वाटत नाही, असेही त्याने यावेळी बोलून दाखवले. धोनीने यष्टिरक्षकाची जागा कायम केल्यानंतर फलंदाजीमध्ये मेहनत घेऊन त्याने संघात स्थान मिळवले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीनंतर सातत्यपूर्ण तो भारतीय संघासोबत राहिला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत धोनी संघात असल्यामुळे त्याला किती सामन्यात संधी मिळते, हे सांगणे फारच कठिण आहे.

ICC World Cup: पाक गोलंदाजाचा प्रशिक्षकालाच बाउन्सर
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:dinesh karthik told i still remain relevant good or bad but people still talk about me also he highlight dhoni name