पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिंगमध्ये मेरी कोमने अपशब्द वापरले, निखत झरीनचा आरोप

मेरी कोम आणि निखत झरीन

ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणीच्या अंतिम फेरीत भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोमने युवा निखत झरीनला ९-० असे पराभूत करत तिचे ऑलिम्पकचे दरवाजे बंद केले. ५१ किलो वजनी गटातील चर्चित लढतीनंतर मेरी कोमने युवा बॉक्सरच्या स्वभावावरुन शाब्दिक पंच मारल्याचे पाहायला मिळाले होते. सामन्यात मेरी कोम विजयी झाल्यानंतर निखत झरीनने टाळ्या वाजवून तिचा विजय साजरा केला. जेव्हा निखत हस्तांदोलन करुन मेरी कोमला शुभच्छा देण्यासाठी गेली तेव्हा मेरी कोमने तिला प्रतिसाद दिला नाही. सामन्यानंतर प्रतिस्पर्धी झरीनने आदर मिळण्यासाठी दुसऱ्याला आदर द्यायला शिकायला हवे, अशी प्रतिक्रिया मेरी कोमने दिली होती. त्यानंतर आता झरीनने मौन सोडले आहे. 

विराटकडून साक्षीचं तोंडभरुन कौतुक!

२३ वर्षीय निखत झरीन म्हणाली की, मेरी कोमचे रिंगमधील वागण खूप खटकले. निकालानंतर मी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. पण मेरीने कोमने माझी गळाभेट घेतली नाही. वरिष्ठ खेळाडूंनी आपल्यापेक्षा ज्यूनियर खेळाडूंना आदर द्यायला पाहिजे असे ती म्हणाली. एवढेच नाही तर रिंगमध्ये सामन्यावेळी मेरी कोमने अपशब्द वापरल्याचेही झरीनने म्हटले आहे.  रिंगमध्ये मेरी कोमने काही अपशब्द वापरले. त्यावर सध्या मला काही बोलायचे नाही. तिने शब्द कोणता उच्चारला हे सांगितले नसले तरी बॉक्सिंगच्या रिंगमधील या दोघींच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत एवढे मात्र नक्कीच म्हणता येईल.

मेरी कोमनं प्रतिस्पर्धी झरीनला रिंगबाहेरही फटकारले

इंडिया ओपनमध्ये मी मेरी कोमसोबतशी खूप संघर्ष केला होता. यावेळी माझी कामगिरी ही पूर्वीपेक्षा उत्तम होती. ९-१ या पंचाच्या निर्णय योग्य वाटत नाही. मी या सामन्याचा अधिक विचार करत बसण्यापेक्षा आगामी स्पर्धेसाठी खेळावर लक्षकेंद्रीत करण्यावर भर देईन, असेही झरीनने म्हटले आहे.