पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीसीसीआयच्या निर्णयावर दिया मिर्झाचा संतप्त सवाल

दिया मिर्झाने बीसीसीआयलाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दिल्ली शहरात हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही बीसीसीआयने क्रिकेटचा सामना खेळवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे अभिनेत्री दिया मिर्झाने म्हटले आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून बीसीसीआयला सुनावले आहे.  हवा प्रदूषणाची पातळी धोकादायक झाली असताना क्रिकेट सामना खेळवण्याचा निर्णय हा हैराण करणारा आहे. ही मानसिकता प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यासारखी आहे. अशा प्रकारामुळे प्रदूषणाचे गांभीर्य आपल्याला अद्याप समजलेले नाही, अशा शब्दांत दियाने संताप व्यक्त केला आहे.   

मॅक्सवेलशिवाय या खेळाडूंना करावा लागला डिप्रेशनचा सामना

बांगलादेशचे प्रशिक्षक डोमिंगोने दिल्लीदील परिस्थिती अनुकूल वाटत नसल्याची प्रतिक्रिया सामन्यापूर्वी दिली आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना या परिस्थितीचा सामना करावा लागले. बांगलादेशचा संघास प्रदूषणाबाबत कोणतीही तक्रार नाही, असे सांगत त्यांन संघ दिल्लीतील सामन्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. काही खेळाडूंना डोळ्यांना आणि गळ्याचा त्रास उद्भवला असून ते सुद्ध ठिक आहेत, असा उल्लेखही त्यांनी केला होता.

Video : बांगलादेशी खेळाडूंची तोंडाला मास्क बांधून प्रॅक्टिस  

भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. ३ सामन्यातील टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यात प्रदूषणाच्या छायेत कोणता संघ भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dia Mirza calls out BCCI for holding Ind vs Bangladesh T20 match despite severe AQI levels