पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Dhoni Keep The Glove : ICC चा आक्षेप, क्रिकेटप्रेमींचा मात्र पाठिंबा

महेंद्र सिंग धोनी

विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या  ग्लोव्ह्जनमुळे सध्या सोशल मीडियावर  एकच चर्चा रंगली आहे. धोनीनं पॅरा स्पेशल फोर्स'चे ‘बलिदान चिन्ह’ असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने धोनीच्या ग्लोव्ह्जवरील चिन्ह काढण्याची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाकडे केली  होती. मात्र धोनीच्या ग्लोव्ह्जवर ICC नं घेतलेला आक्षेप भारतीय क्रिकेटप्रेमींना मुळीच रुचला नाही. 

त्यामुळे #DhoniKeepTheGlove लिहित चाहत्यांनी ICC च्या विनंतीवर आक्षेप घेत हे ग्लोव्हज वापरण्यासाठी धोनीला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.  

अभिनेता रितेश देशमुखनंही धोनीला यावरून पाठिंबा दिला आहे. 'धोनीनं कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. याउलट धोनीनं भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मानच केला आहे. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे.  धोनीनं घातलेले ग्लोव्हज हे अभिमानचं प्रतिक आहे. असं रितेशनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आयसीसीच्या नियमावलीनुसार, सामन्यादरम्यान राजकीय, धार्मिक किंवा अन्य संदेश प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच धोनीने 'बलिदान चिन्ह' असलेले ग्लोव्ह्ज सामन्यादरम्यान वापरू नये, असे आयसीसीने म्हटले  होते.  
भारतीय लष्कराने २०११ मध्ये  महेंद्रसिंह धोनीला  लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल केली होती.  यावेळी धोनीने पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतलं होते. धोनी भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.