पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या निवृत्तीवर एमएसके प्रसाद यांची रिअ‍ॅक्शन

धोनी आणि एमएसके प्रसाद

महेंद्रसिंह धोनी हा दिग्गज खेळाडू आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल तो स्वत: निर्णय घेऊ शकतो, असे बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे. रविवारी एमएसके प्रसाद यांनी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी त्यांनी धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.   

विंडीज दौरा: पांड्या, बुमराहला विश्रांती, नव्या चेहऱ्यांना संधी

एमएसके प्रसाद म्हणाले की, "धोनी हा दिग्गज खेळाडू आहे. त्याच्या निवृत्तीचा निर्णय घेण्यास तो सक्षम आहे." विश्वचषक स्पर्धेपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. विश्वचषकापासूनच भारतीय संघाच्या भविष्यासंदर्भात काही रणनिती आखण्यात येत आहे, असे सांगत    विंडीज दौऱ्यासाठी धोनी उपलब्ध नसल्याची माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली. पुढील काळात पंतला अधिक संधी देण्याबाबत विचार करत आहोत, असा उल्लेखही त्यांनी केला. 

धोनीची जागा कोण घेईल?, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील संघ निवडीपूर्वीच धोनीने माघार घेतली होती. विंडीजसाठी निवडलेल्या भारतीय संघात ऋषभ पंतला तिन्ही प्रकारात संधी देण्यात आली आहे. आगामी काळात पंतला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे प्रसाद यांनी स्पष्ट केल्याने धोनीच्या भविष्या संधी मिळेल, असे