पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 : धवल मुंबईच्या ताफ्यात अजिंक्यसाठी दिल्लीकर उत्सुक

अजिंक्य रहाणे

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाकडून खेळणाऱ्या धवल कुलकर्णी आणि कृष्णाप्पा गौतमला रिलीज केले आहे.  आयपीएलच्या आगामी हंगामात (२०२०) गौतम किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तर धवल कुलकर्णी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहेत. अजिंक्य रहाणे देखील दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई

२०१९ च्या आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळल्यानंतर धवल कुलकर्णी आपल्या घरच्या संघात अर्थात मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. गौतम किंग्ज इलेव्हनच्या ताफ्यातील अश्विनची उणीव भरुन काढेल. ट्रेड ऑफच्या माध्यमातून यापूर्वी ट्रेंट बोल्ट मुंबईच्या ताफ्यात सामिल झाला होता. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसले होते.  तर अंकित राजपूत राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग झाल्याचा पाहायला मिळाले.  

मॅक्सवेलचं कौतुक करताना विराटने सांगितला स्वत:चा अनुभव

अजिंक्य रहाणे २०११ पासून राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसत आहे. त्याने या संघाचे नेतृत्व देखील केले आहे. मात्र आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे. अजिंक्य राहणेच्या बदल्यात दिल्ली कपिटल्स राजस्थानला दोन खेळाडू देण्यास तयार असल्याचे समजते.  ट्रेड ऑफ करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून लवकरच याबाबतचे सर्व चित्र स्पष्ट होईल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:dhawal kulkarni joins mumbai indians Ajinkya Rahane likely to join Ravichandran Ashwin at Delhi Capitals