पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू

यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा होणे असंभव झाले आहे (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे एप्रिल-मेमध्ये यंदाची इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा होण्याची शक्यता नाही. देशात सध्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेता येऊ शकेल का, याची चाचपणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सुरू झाली आहे. सुरुवातीला आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण तूर्त तरी बीसीसीआय एप्रिल किंवा मेमध्ये ही स्पर्धा घेऊ शकेल, अशी स्थिती नाही.

मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ, दोन दिवसांत १२ कोटी जमा

देशात पुढील चार महिन्यांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण कमी झाले तरच ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये यंदाची आयपीएल स्पर्धा घेता येऊ शकेल का, यासाठी चाचपणी करण्यास बीसीसीआयने सुरुवात केली आहे. आपातकालीन उपाय म्हणून ऑगस्टच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा घेता येईल का, याबद्दल सध्या बीसीसीआयकडून शोध घेतला जातो आहे. ऑक्टोबरनंतर ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे त्याच्याआधीच आयपीएल संपवणे आवश्यक आहे. त्यादृष्टिनेच सध्या विचारमंथन सुरू आहे.

कोरोनाच्या हेल्पलाइनवर सामोसे मागणाऱ्याची खास 'प्रसादा'सह इच्छापूर्ती

स्पर्धा घ्यायची म्हटली तर विविध बाजूंवर विचार करण्यात येत आहे. त्यामध्ये परदेशी खेळाडू या हंगामासाठी त्यावेळी उपलब्ध असतील का, जर ते उपलब्ध नसतील तर मग केवळ भारतीय क्रिकेटपटूंना घेऊन स्पर्धा घेता येईल का, यावर विचार केला जात आहे. खरंतर आयपीएल स्पर्धा ही बीसीसीआयसाठी महसूल मिळवून देण्याचे महत्त्वाचे साधन असते. त्यामुळेच कोणत्याही स्थितीत ही स्पर्धा घेणे बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट या दोन्हींसाठी आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.