पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कुलिंग पीरियड' नियम बदलणार? दादासह भारतीय क्रिकेटला होईल फायदा

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट मंडळाच्या आगामी वार्षिक सर्व साधारण बैठकममध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. यात कुलिंग ऑफ पीरियडबाबतच्या नियमामध्ये बदल करण्याबाबत (दोन कार्यकाळातील सक्तीच्या विश्रांतीचा नियम) विचार केला जाईल, असे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुध धूमल यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा योग्य फायदा घेता यावा या उद्देशाने बीसीसीआय घटनेत बदल करण्याचा विचार करत आहे. 

BCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय?

सौरव गांगुली यांनी बीसीसीआयची अध्यक्षपदाची धूरा हाती घेतल्यानंतर बीसीसीआयची घटना आणि ढाचा (प्रारूप) बदलण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे लोढा समितीच्या शिफारशीमध्ये सुधारणा करण्यासही मदत होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या कायद्याअंतर्गत बीसीसीआय व संलग्न स्थानिक क्रिकेट संघटनांमध्ये तीन वर्षांचा कार्यकाळ दोनवेळा पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला तीन वर्षांच्या कुलिंग पीरियडला सामोरे जावे लागते.  

नेतृत्वाच्या कर्तृत्वाचा 'विराट' विक्रम, धोनीला टाकले मागे

धूमल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना कठोर वाटत असलेल्या लोढा समितीच्या शिफारशीमधील ७० वर्षांची कमाल वयोमर्यादेसंदर्भात कोणताही बदल केलेला नाही. पण कुलिंग ऑफ पीरियड नियमावलीमध्ये बदल हा क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल. कारण विविधी ठिकाणी केलेल्या कामाच्या अनुभवाचा खेळाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे आम्हाला वाटते.