पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिरोजशहा कोटला स्टेडियम आता जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

फिरोजशहा कोटला स्टेडियमला आता जेटलींचे नाव देण्यात येणार आहे.

दिल्लीतील फिरोजशहा कोटला आंतरराष्ट्रीय स्टेडियमला भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी असताना जेटली यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच या स्टेडियमचे 'अरुण जेटली आंतरराष्ट्रीय स्टेडियम' असे नामकरण करण्याचा निर्णय दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. 

जेटली यांनी १२ वर्षे दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारतीय संघातील अनेक दिग्गज क्रिकेटर्संना ओळख निर्माण करुन देण्यात जेटलींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.जेटली यांचे शनिवार २५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.   

जेटली माझ्यासाठी वडिलांसमान होते, गंभीरचे भावूक ट्विट

१९८३ मध्ये उभारण्यात आलेले फिरोजशहा कोटला स्टेडियम हे कोलकत्याच्या ईडन गार्डननंतरचे देशातील सर्वात जूने स्टेडियम आहे. ४० हजार प्रेक्षक क्षमता असणाऱ्या स्टेडियममध्ये आतापर्यंत ३४ कसोटी, २५ एकदिवसीय आणि ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत.