पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत या तारखेला होणार मतदान, 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीच निकाल!

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. ८ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीत  आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत १.४६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

७० सदस्यीय दिल्ली विधानसभेचा कार्यकाल २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. निवडणुका या एका टप्प्यातच होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत राज्यात त्रिशंकू लढत होण्याची शक्यता आहे. मतदार यादीत एकूण किती लोकांची नावे आहेत, ते देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान यादीत नाव नसणाऱ्याला मतदान करता येणार नाही. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आम आदमी पार्टी, भाजपा आणि काँग्रेससह इतर पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला सत्ता कायम राखण्यात यश मिळणार की दिल्लीत सत्ता परिवर्तन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

भास्कर जाधवांची समजूत काढण्यासाठी उदय सामंत चिपळूणला

अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षांत कामे झालेली नाहीत. स्थानिक राजकारणात जनतेने त्यांना नाकारले असून विधानसभा निवडणुकीत भाजप दिल्लीच्या निवडणुकीत विजय मिळवेल, असा विश्वास अमित शहा यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात व्यक्त केला होता. 
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळवल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात भाजपला पराभवाचे झटके बसले होते. महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने झारखंड विधानसभाही गमवावी लागली होती. दिल्लीत हा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील असेल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi election date 2020 election commission declare delhi delhi assembly dates or assembly election full schedule