पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालकाला आला पंतचा पुळका, बाकावर बसवायला संघात घेतलय का?

पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते.

जिंदाल साउथ वेस्ट स्पोर्ट्सचे (जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स) प्रमुख आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे सह मालक पार्थ जिंदाल यांनी युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतसाठी बॅटिंग केली आहे. पंतसह फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना एकदिवसीय संघात स्थान न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतला खेळवायचे नाही तर संघात कशाला घेतले? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विनला एकदिवसीय संघात स्थान मिळायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

2000 Match Fixing : काय आहे प्रकरण आणि कोण आहे बुकी संजीव चावला?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत लोकेश राहुलने चांगली कामगिरी केली. परिणामी न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत पंतचा पत्ता कट झाला. आर अश्विन कसोटी संघात आहे पण त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात येत नाही. हे दोन्ही खेळाडू दिल्ली कॅपिटल्सचे आहेत. त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्याने जिंदाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दिसणार नाही, तर...

आयपीएलच्या मालकाने बीसीसीआय निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ही उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
पार्थ जिंदाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, संघात विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची उणीव आहे. तरीही आर. अश्विनला संघात स्थान का दिले जात नाही? त्याच्यात विकेट घेण्याची आणि सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. अश्विनने आपला अखेरचा टी-२० आणि एकदिवसीय सामना हा २०१७ मध्ये खेळला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi co owner parth jindal questions rishabh pant and r ashwing absence from limited over team ipl 2020 indian premier league