पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अश्विन पंजाब नव्हे तर 'या' टीमकडून खेळणार IPL

अश्विन पंजाब नव्हे तर 'या' टीमकडून खेळणार IPL

रवीचंद्रन अश्विन आयपीएलच्या पुढच्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. कारण किंग्स इलेव्हन पंजाबने मागील दोन सत्रातील कर्णधाराला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब टीम अश्विनच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये सातव्या आणि २०१९ मध्ये सहाव्या स्थानावर राहिली होती.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी

किंग्स इलेव्हन पंजाबने २०१८ मध्ये लिलावात अश्विनसाठी ७.६ कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये पंजाबकडून १४ सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या. अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३९ सामन्यात १२५ विकेट घेतल्या आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनला मुक्त करण्यासाठी बीसीसीआयने मंजुरी दिली असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल. दिल्ली कॅपिटल्सने अश्विला संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. पंजाब टीमला एक युवा फिरकीपटूची आवश्यकता आहे.

T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती

पंजाबच्या टीमला २०१४ मध्ये उपविजेता राहिल्यानंतर आयपीएल प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. दिल्ली कॅपिटल्सचे सल्लागार सौरभ गांगुली यांनी म्हटले की, त्यांची टीमला अश्विनला संघात घेण्यासाठी इच्छुक आहे. टीम नवीन कर्णधारासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीनंतरच विचार करेल.